नमस्कार,
संघटना म्हणजे एकतेचे बळ. संघटना म्हणजे संरक्षण. संघटना म्हणजे विश्वास. संघटना म्हणजे निर्धार. हे सारेच आपण अनुभवतो संघटनेच्या झेंड्याखाली. मात्र, त्याकरिता शासन दरबारी मान्यता लागते. गेली तीस वर्षे आपण अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन टिकून आहोत.त्या करिताच दरवर्षी आपल्याला संघटनेची सभासद नोंदणी नोंदवुन सिध्द करावे लागते. हे काम या पूर्वी आपण दरवर्षी पावती पुस्तके छापून करत होतो. मात्र, आपल्यालाही काळाच्या बरोबर जावे लागणार आहे.आपण गेली सहा महिने ऑनलाईन काम करीत आहोत. मग सभासद नोंदणीही ऑनलाईन केली पाहिजे म्हणून आपल्या संघटनेच्या इतिहासातील पहिली ऑनलाईन सभासद नोंदणी सुरू करीत आहोत. आपण सारेच, डिजिटल झालेले आहोत.तेव्हा या नोंदणीतही सहभागी होऊन एक महिन्याच्या आत आपल्या प्रकल्पातील सर्व वर्ग तीन कर्मचाऱ्यांना सभासद करून घ्यावे ही विनंती आहे.
आपला ,
विक्रम गायकवाड,
संस्थापक अध्यक्ष,
आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना,
महाराष्ट्र राज्य, नाशिक.